महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs AUS : बंगळुरूचे हवामान अन् चिन्नास्वामीच्या खेळपट्टीचा रिपोर्ट, जाणून घ्या... - बंगळुरूचे हवामान आणि खेळपट्टीचा अंदाज

भारत-ऑस्ट्रेलिया संघात आज तिसरा निर्णायक सामना खेळवण्यात येणार असून बंगळुरूचे वातावरण आणि चिन्नास्वामीची खेळपट्टी कशी असणार वाचा...

ind vs aus 3rd odi : weather forecast of bangalore rain prediction and pitch report
IND vs AUS : बंगळुरूचे हवामान अन् चिन्नास्वामीच्या खेळपट्टीचा रिपोर्ट, जाणून घ्या...

By

Published : Jan 19, 2020, 11:46 AM IST

Updated : Jan 19, 2020, 11:55 AM IST

बंगळुरू - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ सामन्याच्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा निर्णायक सामना आज बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमध्ये खेळवण्यात येणार आहे. मुंबईतील पहिल्या सामन्यात १० गड्यांनी पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने राजकोटमधील दुसरा सामना ३६ धावांनी जिंकला आणि मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. आज तिसरा निर्णायक सामना खेळवण्यात येणार असून बंगळुरूचे वातावरण आणि चिन्नास्वामीची खेळपट्टी कशी असणार वाचा...

पावसाची शक्यता...
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, बंगळुरूमध्ये आज जवळपास पावसाची शक्यता नाही. यामुळे रोमांचक सामना चाहत्यांना पाहायला मिळू शकतो. बंगळुरूचे तापमान साधारणपणे २५ सेल्सियसच्या आसपास राहिल. मात्र, आद्रता ५७ टक्के इतकी असण्याची शक्यता आहे. या कारणाने दुसऱ्या वेळी गोलंदाजी करणाऱ्या संघाला दव फॅक्टरमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात.

खेळपट्टीचा अंदाज...
एम. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना साथ देणारी आहे. यामुळे मोठी धावसंख्या उभारणे शक्य होईल. तसेच हे मैदान लहान असल्याने, येथे चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. २०१३ मध्ये रोहित शर्माने या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना द्विशतक ठोकले होते. यात त्याने १६ गगनचुंबी षटकारांची आतिषबाजी केली होती.

नाणेफेक महत्वाची...
चिन्नस्वामीची खेळपट्टी आणि दव फॅक्टरमुळे, नाणेफेक जिंकणारा कर्णधार, प्रथम फलंदाजी करण्यासाठी उत्सुक असेल. महत्वाची बाब म्हणजे, या खेळपट्टीवर ३०० ही धावसंख्या सुरक्षित लक्ष्य मानले जात नाही.

उभय संघ यातून निवडणार

  • भारत -
  • विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी.
  • ऑस्ट्रेलिया -
  • अ‌ॅरोन फिंच (कर्णधार), अ‍ॅलेक्स केरी, पॅट कमिन्स, सीन एबोट, एश्टन एगर, पीटर हॅन्ड्सकोम्ब, जोश हेजलवुड, मार्नस लाबुशेन, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, एशटन टर्नर, डेव्हिड वार्नर आणि अ‍ॅडम झम्पा.

हेही वाचा -India vs Australia : आज बंगळुरूत निर्णायक लढत

हेही वाचा -NZ A vs Ind A : मुंबईकर पृथ्वी शॉची कमाल, न्यूझीलंडच्या संघाला झोडपलं.. पाहा व्हिडिओ

Last Updated : Jan 19, 2020, 11:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details