राजकोट - ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू गोलंदाज अॅडम झंम्पा भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी कर्दनकाळ ठरत आहे. त्याने विराटला एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ५ वेळा माघारी धाडलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दोनही सामन्यात झंम्पाने, विराटला बाद केलं आहे. विराटने राजकोटच्या मैदानात ७८ धावांची खेळी केली. त्याला झंम्पाने मिचेल स्टार्ककरवी झेलबाद केलं.
एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा रेकॉर्ड वेस्ट इंडीजचा गोलंदाज रवी रामपालच्या नावे आहे. त्याने विराटला ६ वेळा बाद केले आहे. यानंतर या यादीत ऑस्ट्रेलियाचा अॅडम झंम्पा, श्रीलंकेचा थिसारा परेरा आणि न्यूझीलंडच्या टीम साउदीचा संयुक्तपणे नंबर लागतो. या तिघांनी विराटला प्रत्येकी ५ वेळा बाद केले आहे.