मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्याची एकदिवसीय मालिका यजमान संघाने २-१ अशी जिंकली. यानंतर भारतीय संघाने टी-२० मालिका २-१ ने जिंकत एकदिवसीय मालिकेतील पराभवाची परतफेड केली. आता उभय संघात कसोटी मालिका होणार असून ही मालिका कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. जाणून घ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक...
असे आहे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर – अॅडलेड (दिवस-रात्र)
- दुसरा कसोटी सामना – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
- तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी २०२१ –सिडनी
- चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी – गाबा
विराट चार पैकी फक्त एक कसोटी सामना खेळणार...
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या ३ सामन्यात कर्णधार विराट कोहली खेळणार नाही. कारण विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा गर्भवती आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात अनुष्का शर्मा आणि विराट आई-बाबा होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विराटने बीसीसीआयकडे पॅटनिर्टी लिव्हसाठी अर्ज केला होता. बीसीसीआयने विराटची रजा मंजूर केली आहे. त्यामुळे विराट पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतणार आहे.