मुंबई- आयसीसी विश्व करंडक (१९ वर्षाखालील) स्पर्धेच्या अंतिम सामन्याला काही वेळातच सुरुवात होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात हा 'महामुकाबला' रंगणार आहे. भारतीय संघाची नजर पाचव्या विजेतेपदावर आहे. या सामन्याआधी भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने प्रियम गर्गच्या नेतृत्वात खेळत असलेल्या युवा संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
बीसीसीआयने दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडिओत कर्णधार विराट कोहली, मयांक अगरवाल, केदार जाधव तसेच भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारताच्या युवा संघाला शुभेच्छा देताना दिसून येत आहेत. तर दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून चेतेश्वर पुजारा, विजय शंकर, वृध्दीमान साहा आणि अजिंक्य रहाणे यांनी ज्युनिअर संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.