महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

...म्हणून आम्ही अंतिम फेरीसाठी पात्र नव्हतो, डेव्हिड वॉर्नरची कबुली - Warner on srh performance

जर आम्ही झेल सोडत आहोत आणि संधी गमावत आहोत. तर विजय मिळवणे शक्य नाही. मला वाटते की, गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर खराब सुरूवात झाल्यानंतरही आम्ही सामन्यावर नियंत्रण मिळवले. पण आमच्या पराभवाचे कारण क्षेत्ररक्षण ठरले, असल्याची कबुली हैदराबादचा कर्णधार वॉर्नरने उपांत्य फेरीतील पराभवानंतर दिली.

I'm proud to be where we are today: Warner
...म्हणून आम्ही अंतिम फेरीसाठी पात्र नव्हतो, डेव्हिड वॉर्नरची कबुली

By

Published : Nov 9, 2020, 1:10 PM IST

अबुधाबी -आयपीएलच्या तेराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने उपांत्य फेरीत सनरायझर्स हैदराबादचा १७ धावांनी पराभव करत, हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. या पराभवानंतर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आपल्या संघाच्या कामगिरीवर अभिमान असल्याचे सांगितले. तसेच त्याने उपांत्य फेरीच्या सामन्यात क्षेत्ररक्षणात झालेल्या चूकांची कबूली देत, आम्ही अंतिम फेरीसाठी पात्र नव्हतो, अशी कबूली दिली.

सामना संपल्यानंतर वॉर्नर म्हणाला, जर आम्ही झेल सोडत आहोत आणि संधी गमावत आहोत. तर विजय मिळवणे शक्य नाही. मला वाटते की, गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर खराब सुरूवात झाल्यानंतरही आम्ही सामन्यावर नियंत्रण मिळवले. पण आमच्या पराभवाचे कारण क्षेत्ररक्षण ठरले,

हैदराबादचा संघ...

'आयपीएलच्या कामगिरीवर वॉर्नर म्हणाला, 'स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर असणे हे आमच्या संघासाठी अभिमानाची बाब आहे. कारण आमचा संघ या ठिकाणापर्यंत पोहचेल असे कोणालाही वाटले नव्हते.'

पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला सुरूवातीपासून जेतेपदाचे दावेदार असल्याचे कोणीही गृहीत धरले नव्हते. प्रत्येक जण मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूविषयी चर्चा करत होता. आमची कामगिरी आभिनास्पद आहे. खेळाडूंची दुखापत आमच्याासाठी डोकेदुखी ठरली. यामुळे आमच्यासमोर अडचण निर्माण झाल्या. तरीदेखील आज आम्ही ज्या ठिकाणापर्यंत पोहोचलो आहेत. त्यावर आम्हाला गर्व आहे, असेही वॉर्नरने सांगितले.

हेही वाचा -हैदराबादला नमवून दिल्लीची प्रथमच फायनलमध्ये धडक, आता गाठ मुंबईशी

हेही वाचा -Women's T20 Challenge : सुपरनोव्हाज आणि ट्रेलब्लेझर्स यांच्यात जेतेपदासाठी झुंज

ABOUT THE AUTHOR

...view details