लंडन- विश्वकरंडक स्पर्धेमधील भारत विरुध्द पाकिस्तान हा हायहोल्टेज सामन्याला सुरुवात होण्यास मोजकेच तास शिल्लक राहिले आहेत. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने 'आम्ही कोणत्याही संघावर विजय मिळवण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटलं आहे. तो आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होता. आम्ही सगळ्या आघाड्यावर चांगली कामगिरी करणार असल्याचा विश्वासही त्याने बोलून दाखवला.
WC २०१९ : आम्ही पाकिस्तानवर विजय मिळणारच; विराटला विश्वास - विराट कोहली
विश्वकरंडक स्पर्धेमधील भारत विरुध्द पाकिस्तान हा हायहोल्टेज सामन्याला सुरुवात होण्यास मोजकेच तास शिल्लक राहिले आहेत. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने 'आम्ही कोणत्याही संघावर विजय मिळवण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटलं आहे.
आम्ही जर चांगला खेळ केला तर कोणत्याही संघावर विजय मिळवू शकतो. समोर कोणताही संघ असला तरीही प्रत्येक खेळाडूने सर्वोत्तम कामगिरी करणं अपेक्षित आहे. पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात आम्ही चांगला खेळ करु आणि विजय मिळवू, अशी मनिषा त्याने पत्रकारांना बोलून दाखवली.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या सामन्यात ५ बळी घेऊन भारताला एकप्रकारे इशारा दिला आहे. यावर बोलताना कोहली म्हणाला. आम्ही पाकिस्तानच्या सगळ्याच गोलंदाजावर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न करु, असंही तो म्हणाला. विशेष म्हणजे आतापर्यंत विश्वकरंडक स्पर्धेत भारत एकदाही पाकिस्ताकडून पराभूत झालेला नाही.