महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

जागतिक कसोटी अजिंक्यपद: भारताचे अव्वलस्थान भक्कम तर पाकिस्तान तळाला

ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर खेळताना सलग १० मालिका विजयांची नोंद केली होती. तेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाचा हा विक्रम मोडित काढत ११ वा कसोटी मालिका विजय मिळवला आहे. पुण्यात रंगलेल्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीचे नाबाद द्विशतक आणि भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत त्याला दिलेली साथ या जोरावर भारताने हा सामना डाव राखून जिंकला.

जागतिक कसोटी अजिंक्यपद: भारताचे अव्वलस्थान भक्कम तर पाकिस्तान तळाला

By

Published : Oct 13, 2019, 6:00 PM IST

दुबई - दक्षिण आफ्रिका विरुध्दच्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने दुसरा सामना जिंकत २-० ने विजयी आघाडी घेतली. पुण्याच्या गहुंजे मैदानात रंगलेला दुसरा सामना भारताने १ डाव १३७ धावांनी जिंकला. दरम्यान, घरच्या मैदानावर भारताचा हा ११ वा कसोटी मालिका विजय ठरला आहे. याआधी अशी कामगिरी ऑस्ट्रेलियाने केली होती. त्यांच्या विक्रम भारताने मोडीत काढला आहे.

ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर खेळताना सलग १० मालिका विजयांची नोंद केली होती. तेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाचा हा विक्रम मोडित काढत ११ वा कसोटी मालिका विजय मिळवला आहे. पुण्यात रंगलेल्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीचे नाबाद द्विशतक आणि भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत त्याला दिलेली साथ या जोरावर भारताने हा सामना डाव राखून जिंकला.

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात...

दरम्यान, या विजयासह भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अव्वलस्थानही भक्कम केले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ सध्या ४ सामन्यात ४ विजय मिळवून अव्वलस्थानी आहे. भारताचे कसोटी अजिंक्यपदासाठी ठरवून दिलेल्या नियमानुसार २०० गुण आहेत. या मालिकेतला अखेरचा सामना १९ ऑक्टोबरपासून रांचीच्या मैदानावर रंगणार आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची क्रमवारी

  • भारत - २०० गुण
  • न्यूझीलंड - ६० गुण
  • श्रीलंका - ६० गुण
  • ऑस्ट्रेलिया - ५६ गुण
  • इंग्लंड - ५६ गुण
  • वेस्ट इंडीज - ० गुण
  • दक्षिण आफ्रिका - ० गुण
  • बांगलादेश - ० गुण
  • पाकिस्तान - ० गुण

ABOUT THE AUTHOR

...view details