नवी दिल्ली- भारताचे आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या जेतेपदाचे स्वप्न तिसऱ्यांदा भंगले. भारताचा उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने १८ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताच्या टॉप फलंदाजांनी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. तेव्हा महेंद्रसिंह धोनीने संघाची पडझड रोखली. त्याने जडेजासोबत सातव्या विकेटसाठी ११६ धावांची भागिदारी केली. धोनी आणि जडेजाच्या भागिदारीने भारत पुन्हा सामन्यात परतला. मात्र धोनीचे प्रयत्न भारताला विजय मिळवू शकले नाहीत. आणि शेवटी भारताचा पराभव झाला.
पराभवानंतर सोशल मीडियावर धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये धोनी खूपच भावनिक झाल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवरुन काही चाहत्यांनी धोनी रडावलेला दिसत होता असा दावा केला आहे. यापूर्वी धोनीला अशा रुपात चाहत्यांनी कधीचा पाहिलेले नव्हते.
काय आहे त्या व्हिडिओची घटना -
भारतीय संघाचे टॉप आर्डर फलंदाजी न्यूझीलंडसमोर ढेपाळली. तेव्हा धोनी संघाला विजय मिळवून देण्यासाठी मैदानात खंबीरपणे उभा राहिला. मात्र मोक्याच्या क्षणी मार्टिन गुप्टीलच्या अचुक फेकीने धोनी धावबाद झाला. तेव्हा धोनी हताश होऊन पॅव्हेलियनकडे निघाला. त्याच्या चेहरा धीरगंभीर बनला होता. तो आपली मान खाली करुन पॅव्हेलियनकडे निघाला. धोनी बाद झाल्यानंतर भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या. याचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
धोनीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामध्ये चाहत्यांनी धोनीला सांगितलं की, आम्ही पराभव सहन करु पण, तुझ्या डोळ्यातील अश्रु आम्ही कधीच सहन करणार नाही. असा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.
न्यूझीलंडविरुध्द मैदानात नांगर टाकून उभ्या ठोकलेल्या धोनीनी सामन्यात अर्धशतक झळकावले. मात्र त्याचे हे अर्धशतक भारताला विजय मिळवू शकले नाही.