दुबई - आयसीसीने महिला टी-२० क्रमवारी जाहीर केली असून यात भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधनाने मोठी झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या तिरंगी मालिकेत स्मृतीने ५ सामन्यात दोन अर्धशतकांसह २१६ धावा केल्या. याचा फायदा तिला क्रमवारीत झाला असून ती ७३२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिरंगी मालिकेआधी स्मृती ७ व्या स्थानी होती. तर दुसरीकडे जेमिमा रॉड्रिग्जची क्रमवारीत ३ स्थानाने घसरण झाली असून ती सातव्या स्थानावर पोहोचली आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौर ९ व्या स्थानावर कायम आहे. तिने तिरंगी मालिकेत ११८धावा केल्या होत्या. या यादीत न्यूझीलंड संघाची सूझी बेट्स ७६५ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.