लंडन- पाकिस्तानने स्पर्धेत अजेय असलेल्या न्यूझीलंड संघाला नमवले. यानंतर पाकिस्तानच्या संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने 'हटके' प्रतिक्रिया दिली आहे. पाँटिंग म्हणतो, पाकिस्तानचा संघ बेभरवशाचा संघ आहे. तो जगातल्या कोणत्याही संघाला हरवू शकतो, तसेच तो दुबळ्या संघाकडूनही पराभूतही होऊ शकतो. पाकची लढाई ही स्वतःशीच असल्याचे त्यानं सांगितलं.
पाकिस्तानचा आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजकडून दारुण पराभव झाला. त्यानंतर पाक संघावर कडाडून टीका झाली. तेव्हा पाकिस्तानच्या संघाने विश्वकरंडक विजेतेपदाचे दावेदार
यजमान इंग्लडचा १४ धावांनी पराभव केला. श्रीलंकेविरुध्दचा तिसरा सामना पावसाअभावी झाला नाही. चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ४१ धावांनी पराभव केला. त्यानंतर भारत विरुध्दच्या हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमाने ८९ धावांनी पाणी पाजलं.
भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानच्या संघावर कडाडून टीका झाली. काही चाहत्यांनी तर पाकिस्तानी खेळाडूंना शिवीगाळ केली. तेव्हा पाकच्या खेळाडू सगळ झुगारुन नव्या उमेदीने मैदानात उतरले. पुढील सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि विश्वकरंडकाचे दावेदार समजल्या जाणाऱ्या न्यूझीलंडचा पराभव केला. यामुळे पाकिस्तानचा संघ बेभरवशाचा असल्याचे दिसून येत आहे.
पाकिस्तानच्या संघावर प्रतिक्रिया देताना रिकी पाँटिंग म्हणतो, हा पाकिस्तानचा संघ हा बेभरवशाचा संघ आहे. हा संघ जगातील कोणत्याही संघाला पराभूत करु शकतो. तर कधी दुबळ्या संघाकडूनही स्वतःह पराभूत होऊ शकतो. पाकिस्तान संघाचा सामना मैदानात विरुध्दच्या संघाबरोबर नसतो. तो स्वतःह बरोबर असतो. असं त्यानं सांगितलं.
न्यूझीलंड विरुध्दच्या विजयानंतर पाकिस्तान संघाचे स्पर्धेतील आव्हान टिकून आहे. मात्र, पाकला उपांत्य फेरी गाठण्यासाठी पुढील दोन्ही सामने कोणत्याही स्थितीत जिंकावे लागतील. जरी पाकने दोन्ही सामने जिंकले तरी इंग्लडचा संघ दोन सामन्यामधील एक सामन्यात पराभव होणे गरजेचे आहे.