दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकतीच कसोटी क्रमवारी जाहीर केली. आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने अव्वलस्थान कायम राखले आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा व्हर्नन फिलँडरची गोलंदाजी कारकिर्द ११ व्या स्थानावर संपूष्टात आली.
विराट कसोटी क्रमवारीत ९२८ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. तर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेची मात्र नवव्या स्थानावर घसरण झाली आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ असून तो विराटपेक्षा १७ गुणांनी मागे आहे. क्रमवारीत चेतेश्वर पुजारा आणि अंजिक्य रहाणे अनुक्रमे ६ व्या आणि ७ व्या क्रमाकांवर आहेत.
गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह ७९४ गुणासंह ६ व्या स्थानावर आहे. तर आर अश्विन आणि मोहम्मद शमी अनुक्रमे ८ व्या आणि ९ व्या स्थानावर आहेत. या यादीत पॅट कमिन्स ८५२ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.