दुबई - भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने मायदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरुध्दच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली. याच कामगिरीच्या जोरावर शमीने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टॉप-१० मध्ये जागा मिळवली.
मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या ३ सामन्याच्या कसोटी मालिकेत १३ गडी बाद केले. त्यानंतर त्याने बांगलादेश विरुध्दच्या २ सामन्याच्या मालिकेत ९ गड्यांना माघारी धाडले. शमीला या कामगिरीचा फायदा झाला. सध्या शमी कसोटी क्रमवारीत ७७१ गुणांसह १० व्या स्थानावर आहे.
कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स ९०० गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर टॉप-१० मध्ये ३ भारतीय गोलंदाज आहेत. यात जसप्रीत बुमराह ७९४ गुणांसह पाचव्या स्थानी तर रवीचंद्रन अश्विन ७७२ गुणांसह नवव्या स्थानावर विराजमान आहे.