दुबई- आफ्रिकन वंशाचा अमेरिकेचा नागरिक जॉर्ज फ्लॉयड याचा पोलीस अत्याचारामुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर जगभरात वर्णद्वेषाविरुद्ध आवाज बुलंद होऊ लागला आहे. वेस्ट इंडीजचे खेळाडू ख्रिस गेल आणि डेरेन सॅमी यांच्यासह अनेक खेळाडूंनी देखील वर्णद्वेषाविरुद्ध आवाज उठवला आहे. सॅमीने तर आयसीसीला कृष्णवर्णीय खेळाडूंच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. आता वर्णद्वेषाबाबत आयसीसीने प्रतिक्रिया दिली आहे.
विविधतेशिवाय क्रिकेट अस्तित्वहिन असल्याचे आयसीसीने म्हटले आहे. हे सांगताना आयसीसीने शुक्रवारी ९० सेकंदांची व्हिडिओ क्लिप पोस्ट केली. ही क्लिप २०१९ साली इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील आहे. यात जोफ्रा आर्चर न्यूझीलंडविरुद्ध अखेरचे षटक टाकताना दिसत आहे. आयसीसी ही क्लिप शेअर करताना म्हणते की, 'विविध ते शिवाय क्रिकेटचे अस्तित्व काहीही नाही. विविधता नसेल तर स्पष्ट चित्र पुढे येत नाही.'