दुबई - न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० मालिका संपल्यानंतर आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. विराट ताज्या क्रमवारीनुसार आठव्या क्रमांकावरुन सातव्या स्थानावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडच्या टीम सेफर्टने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत टीम सिफर्टने धडाकेबाज कामगिरी नोंदवली होती. याचा त्याला फायदा झाला आहे. त्याच्या क्रमवारीत तब्बल २४ स्थानाची सुधारणा झाली आहे. सेफर्टने पाकविरुद्धच्या कामगिरीच्या जोरावर टॉप-१० मध्ये प्रवेश मिळवला आहे. सेफर्ट नवव्या स्थानावर विराजमान झाला आहे. भारताच्या लोकेश राहुलने आपले तिसरे स्थान कायम राखले आहे.
भारतीय धुरंदर गोलंदाजांना मिळालं नाही स्थान