दुबई -आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी यूएईच्या दोन क्रिकेटपटूंना निलंबित केले आहे. मोहम्मद नावेद आणि शमीन अन्वर बट्ट अशी या दोन क्रिकेटपटूंची नावे आहेत.
आयसीसीने म्हटले आहे की, दोन्ही क्रिकेटपटू आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी कोड अंतर्गत ऑक्टोबर २०१९ मध्ये टी-२० विश्वचषक पात्रतेदरम्यान दोषी आढळले. यूएईत ही पात्रता स्पर्धा सुरू होण्यापूर्वी या दोघांवर निलंबनाची कारवाई झाली होती.