कोलंबो -आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू दिलहारा लोकुहेतिगेला निलंबित केले आहे. लोकुहेतिगे टी-१० लीग दरम्यानच्या भ्रष्टाचाराच्या तीन आरोपांमध्ये दोषी आढळला. आयसीसीने म्हटले आहे की, नोव्हेंबर २०१९मध्ये तीन सदस्यीय न्यायाधिकरणाने आरोप लावल्यानंतर लोकुहेतिगेला तिन्ही प्रकरणांत दोषी ठरविण्यात आले.
२००५मध्ये लोकुहेतिगे श्रीलंकेच्या एकदिवसीय संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर, २००८मध्ये तो संघासाठी पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला. आयसीसीने चौकशी पूर्ण केल्यानंतर आपला निर्णय दिला आहे. एखाद्या पक्षावर प्रभाव पाडणे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आणि खेळावर थेट प्रभाव पाडणे असे लोकुहेतिगेवर आरोप होते. याशिवाय त्याच्यावर भ्रष्टाचाराच्या पध्दती सांगण्यात अपयशी ठरल्याचा ठपकाही लावण्यात आला आहे.