दुबई -आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मुख्यालयातील काही कर्मचारी कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. यूएई हेल्थ प्रोटोकॉल अंतर्गत हे कर्मचारी आता क्वारंटाइन राहतील. या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी मिळाली आहे.
आयसीसीच्या मुख्यालयात कोरोनाचा प्रवेश!
आयसीसी मुख्यालय काही दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण परिसर सॅनिटाइझ केला जाईल. आयसीसी अकादमीची मैदाने ही वेगवेगळ्या ठिकाणी आणि मुख्यालयापासून दूर असल्याने आयपीएलमधील संघांच्या सरावासाठी सुरक्षित आहेत.
कठोर आरोग्य सुरक्षा प्रोटोकॉल अंतर्गत दुबईतील आयसीसी मुख्यालय काही दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण परिसर सॅनिटाइझ केला जाईल. आयसीसी अकादमीची मैदाने ही वेगवेगळ्या ठिकाणी आणि मुख्यालयापासून दूर असल्याने आयपीएलमधील संघांच्या सरावासाठी सुरक्षित आहेत.
आयसीसीकडून याबाबत कोणताही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पंरतू बोर्डाच्या वरिष्ठ सदस्याने याची पुष्टी केली आहे. आयसीसी प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही या सदस्याने सांगितले आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, आयसीसीचे सर्व संक्रमित कर्मचारी क्वारंटाइन आहेत. त्यांच्याशी संपर्कात असलेल्या लोकांनीही स्वत: ला वेगळे केले आहे.