महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आयसीसीने शेअर केला क्रिकेटविश्वातील द्रविडचा अबाधित विक्रम

द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये 31,258 चेंडू खेळले आहेत, जो की एक विक्रम आहे. आजवर कोणताही फलंदाज तीस हजारांपेक्षा जास्त चेंडू खेळू शकलेला नाही. या विक्रमाची आयसीसीने आठवण काढली आहे. प्रत्येक कसोटी सामन्यात द्रविडची चेंडू खेळण्याची सरासरी 190.6 अशी होती.

icc shared rahul dravid's iconic test match record
आयसीसीने शेअर केला क्रिकेटविश्वातील द्रविडचा अबाधित विक्रम

By

Published : Jul 11, 2020, 5:47 PM IST

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) शनिवारी भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या मोठ्या कसोटी विक्रमाची आठवण शेअर केली. द्रविडची गणना जगातील सर्वांत महान फलंदाजांमध्ये केली जाते. त्याच्या नावावर क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आहेत.

द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये 31,258 चेंडू खेळले आहेत, जो की एक विक्रम आहे. आजवर कोणताही फलंदाज तीस हजारांपेक्षा जास्त चेंडू खेळू शकलेला नाही. या विक्रमाची आयसीसीने आठवण काढली आहे. प्रत्येक कसोटी सामन्यात द्रविडची चेंडू खेळण्याची सरासरी 190.6 अशी होती.

जागतिक क्रिकेटमध्ये द्रविडला 'द वॉल' म्हणून ओळखले जाते. 1994 ते 2012 या काळात तो भारतीय संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य होता.

याशिवाय आयसीसीने राहुल द्रविडच्या एका पोस्टवर ब्रायन लाराची प्रतिक्रियाही शेअर केली आहे. ''मला जर आजीवन एखाद्याची फलंदाजी बघायची असेल तर ती राहुल द्रविडची असेल'', असे लाराने द्रविडच्या फलंदाजीचे कौतुक करत म्हटले आहे.

सरळ-साधे व्यक्तिमत्व, तंत्रशुद्ध शैलीचा बादशहा, मेहनती, जॅमी, जेंटलमॅन, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या द्रविडने टीम इंडियाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. एमबीएचे शिक्षण सुरू असताना द्रविडने कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली. क्रिकेटची पंढरी असलेल्या इंग्लंडमधील लॉर्ड्सच्या मैदानावर 1996 मध्ये त्याने आपला पहिला सामना खेळला होता. दुखापतग्रस्त संजय मांजरेकरच्या जागी द्रविडला मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वात संघात स्थान देण्यात आले. या सामन्यात त्याने 95 धावांची जबरदस्त खेळी साकारली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details