नवी दिल्ली - इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषक स्पर्धेतील सामने वेळापत्रकानुसारच होतील, अशी माहिती (आयसीसी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सध्यातरी विश्वचषकातील भारत-पाक लढतीत कोणताही बदल होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. असे असले तरीही या प्रकरणात बीसीसीआय आणि भारत सरकार यांच्या भुमिकेवर भारत-पाक सामन्यांचे भविष्य अवलंबून असणार आहे.
विश्वचषकातील भारत-पाक लढतीत कोणताही बदल नाही - आयसीसी - सीआरपीएफ
बीसीसीआय आणि भारत सरकार यांच्या भूमिकेवर भारत-पाक सामन्यांचे भविष्य अवलंबून असेल.
जम्मू काश्मिरमधल्या पुलवामा येथे सीआरपीएफ ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पूर्ण देश तीव्र संताप व्यक्त करत आहे. या हल्ल्याचे पडसाद भारत पाक क्रिकेट संबंधावरही मोठ्या प्रमाणात पडले असून दोन्ही प्रतिस्पर्ध्यांच्या विश्वचषकातील लढतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकविरुध्द खेळू नये, अशी मागणी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया तसेच भारतातील क्रीडा चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बीसीसीआय काय निर्णय घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.