नवी दिल्ली - २००७ च्या विश्वकरंडक विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावलेल्या भारतीय गोलंदाज जोगिंदर शर्माचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कौतुक केले आहे. जोंगिदर आता हरियाणा पोलिस विभागामध्ये डीएसपी पदावर कार्यरत आहे. २००७ च्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील अखेरच्या षटकात जोगिंदरने महत्वाची भूमिका बजावली होती. हा सामना पाकिस्तानविरूद्ध खेळला गेला होता.
“REAL WORLD HERO”, आयसीसीने केलं वर्ल्डकप’स्टार’चं कौतुक! - former crickter joginder sharma latest news
“२००७ टी -२० विश्वचषकाचा आणि २०२० मध्ये जगाचा खरा नायक. जोगिंदर शर्मा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर पोलिसांच्या भूमिकेत या कठीण काळात कर्तव्य बजावणाऱ्यांपैकी एक”, असे आयसीसीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
“REAL WORLD HERO”, आयसीसीने केलं वर्ल्डकप’स्टार’चं कौतुक!
“२००७ टी -२० विश्वचषकाचा आणि २०२० मध्ये जगाचा खरा नायक. जोगिंदर शर्मा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर पोलिसांच्या भूमिकेत या कठीण काळात कर्तव्य बजावणाऱ्यांपैकी एक”, असे आयसीसीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. लोकांनी आपल्या घरात राहावे, म्हणून पोलिस कर्मचारी तातडीने आपले कर्तव्य बजावत आहेत. यावेळी जोगिंदरही पोलिस म्हणून आपले कर्तव्य बजावत असल्याचे समोर आले होते.