मँचेस्टर- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात पावसाने हजेरी लावली. भारत विरुध्द न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने ४६.१ षटकात ५ बाद २११ धावा केल्या. त्यावेळी अचानक पावसाने सुरुवात झाली. जर हा पाऊस थांबला नाही तर आयसीसीच्या कोणते नियम लागू होतात ते पाहू...
पावसाने उपांत्य सामना धुऊन गेला तर... 'या' संघाला होणार फायदा; वाचा आयसीसीचे नियम - semi final
आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात पावसाने हजेरी लावली. भारत विरुध्द न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने ४६.१ षटकात ५ बाद २११ धावा केल्या. त्यावेळी अचानक पावसाने सुरुवात झाली. जर हा पाऊस थांबला नाही तर आयसीसीच्या कोणते नियम लागू होतात ते पाहू...
पहिला नियम -
उपांत्य फेरीच्या सामन्यात पाऊस पडला आणि संपूर्ण दिवसात सामना झाला नाही. किंवा पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तर त्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात येतो. त्यामुळे आज जर पाऊस थांबला नाही तर उद्या भारत विरुध्द न्यूझीलंडचा सामना पुन्हा सुरू होईल. पण पावसामुळे ज्या षटकात सामना थांबला होता त्या षटकापासून पुढील सामन्याला पुढच्या दिवशी सुरूवात होईल.
दुसरा नियम -
पावसामुळे जर सामना रद्द करण्याची पाळी आली, तर दोन्ही संघांतील सामन्यात नेमके काय झाले हे पाहावे लागेल. यामध्ये ज्या संघाने विजय मिळवला आहे. ते पाहिले जाते. मात्र या विश्वकरंडक स्पर्धेत भारत विरुध्द न्यूझीलंडचा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. असे असल्याने साखळी सामन्यातील गुणातालिका पाहिली जाईल. सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतचा संघ गुणातालिकेत अव्वल असल्याने भारत अंतिम फेरीत जाईल.