महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

T२० Ranking : विराटची घसरण, मॉर्गन आणि डी कॉकची मोठी झेप - क्विंटन डी कॉक

आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत इंग्लंडचा कर्णधार ईयॉन मॉर्गन आणि क्विंटन डी कॉकला चांगला फायदा झाला आहे. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत मॉर्गनने चांगली कामगिरी करत मालिकावीरचा पुरस्कार पटकावला. या कामगिरीचा फायदा त्याला झाला असून तो विराटला मागं टाकत नवव्या स्थानी विराजमान झाला आहे.

icc releases new t20 ranking eoin morgan replaces virat kohli rahul at number 2
T20 Ranking : विराटची घसरण, मॉर्गन आणि डी कॉकची मोठी झेप

By

Published : Feb 18, 2020, 1:37 PM IST

Updated : Feb 18, 2020, 3:00 PM IST

दुबई- दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेनंतर आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. नव्या क्रमवारीनुसार टॉप-१० खेळाडूंच्या यादीत बदल पाहायला मिळाले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची एका स्थानाने घसरण झाली आहे. तो नवव्या स्थानावरुन दहाव्या स्थानी पोहोचला आहे. तर दुसरीकडे भारताचा भरवशाचा फलंदाज केएल राहुल दुसऱ्या स्थानावर कायम आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत इंग्लंडचा कर्णधार ईयॉन मॉर्गन आणि क्विंटन डी कॉकला चांगला फायदा झाला आहे. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत मॉर्गनने चांगली कामगिरी करत मालिकावीरचा पुरस्कार पटकावला. या कामगिरीचा फायदा त्याला झाला असून तो विराटला मागं टाकत नवव्या स्थानी विराजमान झाला आहे. रोहित शर्मा ११ व्या स्थानी कायम आहे.

ईयॉन मॉर्गन

दुसरीकडे आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी कॉकनेही इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली. त्याने टेम्बा बाऊमा यांच्यासोबत तिन्ही सामन्यात अर्धशतकी सलामी दिली. नव्या क्रमवारीनुसार डी कॉकने १० स्थानाची प्रगती केली. तो आता १६ व्या स्थानी आहे.

क्विंटन डी कॉक

पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम फलंदाजीच्या यादीत पहिल्या स्थानावर कायम आहे. तर गोलंदाजीच्या क्रमवारीत कोणतेही बदल झालेले नाहीत. अफगाणिस्तानचा राशिद खान या यादीत पहिल्या स्थानावर कायम आहे.

Last Updated : Feb 18, 2020, 3:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details