दुबई -आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कोरोनामुळे महिला विश्वकरंडक पात्रता आणि 19 वर्षांखालील विश्वकरंडक पात्रता स्पर्धा तहकूब करण्याची घोषणा केली. महिलांची पात्रता स्पर्धा 3 ते 19 जुलै दरम्यान श्रीलंकेत होणार होती. त्यापैकी तीन संघ पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरणार होते.
महिला आणि युवा विश्वकरंडक पात्रता स्पर्धा स्थगित - icc world cup qualifier news
महिलांची पात्रता स्पर्धा 3 ते 19 जुलै दरम्यान श्रीलंकेत होणार होती. त्यापैकी तीन संघ पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरणार होते. दुसरीकडे, 2022 च्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक पात्रता स्पर्धेचे सामने 24 ते 30 जुलै दरम्यान डेन्मार्कमध्ये सुरू होणार होते.
दुसरीकडे, 2022 च्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक पात्रता स्पर्धेचे सामने 24 ते 30 जुलै दरम्यान डेन्मार्कमध्ये सुरू होणार होते. आयसीसीने सांगितले, की जेव्हा ही स्पर्धा आयोजित केली जाईल, तेव्हा सहभागी देशांशी चर्चा केली जाईल.
आयसीसी स्पर्धांचे प्रमुख ख्रिस टेटली म्हणाले, "सरकार आणि सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या सल्ल्यामुळे आम्ही होणार्या दोन पात्रता स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.'' आफ्रिका पात्रता स्पर्धा 7 ते 14 ऑगस्ट दरम्यान टांझानियामध्ये होणार आहेत, तर आशिया पात्रता स्पर्धा 1 ते 9 डिसेंबर दरम्यान थायलंडमध्ये होणार आहेत.