दुबई -आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी आयसीसी पुरूष क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग-ए च्या दुसऱ्या स्पर्धेस स्थगिती देण्याची घोषणा केली. कोरोनावर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तीन चॅलेंज लीग-ए स्पर्धांपैकी दुसरी स्पर्धा मार्चमध्ये घेण्यात येणार होती. मात्र, कोरोनामुळे ही स्पर्धा ३० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या काळात मलेशियामध्ये हे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आयसीसी पुरूष क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग-ए स्पर्धा स्थगित - icc latest news
आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये एक व्यापक आकस्मिक नियोजन प्रक्रिया म्हणून आणि संबंधित सदस्य आणि संबंधित सरकारी आरोग्य अधिकारी यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर हा कार्यक्रम तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आयसीसी पुरूष क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग-ए स्पर्धा स्थगित
आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये एक व्यापक आकस्मिक नियोजन प्रक्रिया म्हणून आणि संबंधित सदस्य आणि संबंधित सरकारी आरोग्य अधिकारी यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर हा कार्यक्रम तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कॅनडा, डेन्मार्क, मलेशिया, कतार, सिंगापूर आणि वेणुआटू यांना चॅलेंज लीग-एच्या टेबलमध्ये स्थान मिळवण्यासाठी १५ लिस्ट-ए सामने खेळावे लागणार होते. रन रेटच्या बाबतीत आठ गुणांसह कॅनडा सध्या सिंगापूरच्या पुढे आहे.