दुबई -कोरोनाच्या उद्रेकामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) यंदा होणारी आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा स्थगित केली आहे. आज झालेल्या आयसीसीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यंदा 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा होणार होती. मात्र, ती आता स्थगित करण्यात आली आहे.
कोरोनामुळे ICC T-20 World cup स्पर्धा पुढे ढकलली, आयपीएलचा मार्ग मोकळा ! - t20 world cup update
स्थगित झालेली ही विश्वकरंडक स्पर्धा आता पुढच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होईल. त्याचबरोबर अंतिम सामना 14 नोव्हेंबरला खेळवला जाईल. तर, 2023 मध्ये भारतात होणारी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवण्यात येणार असून या स्पर्धेचा अंतिम सामना 26 नोव्हेंबरला पार पडेल.
स्थगित झालेली ही विश्वकरंडक स्पर्धा आता पुढच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होईल. त्याचबरोबर अंतिम सामना 14 नोव्हेंबरला खेळवला जाईल. 2022 ला होणारी विश्वकरंडक स्पर्धाही ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणार असून अंतिम सामना 13 नोव्हेंबर 2022 रोजी होईल. तर, 2023 मध्ये भारतात होणारी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवण्यात येणार असून या स्पर्धेचा अंतिम सामना 26 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडेल. ही स्पर्धा मार्च-एप्रिल महिन्यात रंगणार होती. मात्र, पात्रता प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे.
विश्वकरंडक स्पर्धा स्थगित झाल्यामुळे आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय यंदा होणारी आशिया चषक स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएलचे आयोजन दुबईत होण्याची चर्चा होत असून बीसीसीआय याबद्दल घोषणा करण्याची शक्यता आहे. 26 सप्टेंबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान आयपीएल खेळवण्यात येऊ शकते, असे वृत्त आहे.