दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शुक्रवारी आपल्या सदस्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाचे संकट टळल्यानंतर क्रिकेटच्या पुनरागमानसाठी या सूचना आहेत. वैद्यकीय सल्लागार समितीची मदत घेऊन आयसीसीने या सूचना तयार केल्या आहेत.
क्रिकेटच्या पुनरागमानसाठी आयसीसीकडून मार्गदर्शक सूचना जाहीर - guidelines for cricket restoration news
आयसीसीने शुक्रवारी आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक आणि 14 दिवसांचे स्वतंत्र प्रशिक्षण शिबीर घेण्याची शिफारस केली आहे. क्रिकेट कधी सुरू होईल याविषयी सूचनांमध्ये काही सांगण्यात आलेले नाही.
क्रिकेटच्या पुनरागमानसाठी आयसीसीकडून मार्गदर्शक सूचना जाहीर
आयसीसीने शुक्रवारी आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक आणि 14 दिवसांचे स्वतंत्र प्रशिक्षण शिबीर घेण्याची शिफारस केली आहे. क्रिकेट कधी सुरू होईल याविषयी सूचनांमध्ये काही सांगण्यात आलेले नाही. स्थानिक आणि राष्ट्रीय सरकारच्या नियमांचे पालन करून आयसीसीने या मार्गदर्शक सूचना आपल्या सदस्यांना वापरण्याचा सल्ला दिला आहे.