मँचेस्टर -भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे तीन आठवड्यांसाठी विश्वकरंडकातून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने धवनला पर्याय म्हणून (बॅकअप खेळाडू) ऋषभ पंतला इंग्लंडला बोलवून घेतले आहे.
नाही-नाही म्हणता ऋषभ पंत उतरला मैदानात, बीसीसीआयने फोटो केला ट्विट - rishabh pant
आज बीसीसीआयने ऋषभ पंतचा मैदानावरील एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
ऋषभ पंत उतरला मैदानात,
आज बीसीसीआयने ऋषभ पंतचा मैदानावरील एक फोटो ट्विटरवर शेअर करत लिहीले आहे की, 'पहा कोण आले आहे'. या फोटो त पंतच्या मागे भारतीय संघ सराव करताना दिसत आहे.
मात्र अजूनही बीसीसीआयने अधिकृतरित्या धवनचा बदली खेळाडू म्हणून ऋषभच्या निवडीची घोषणा केलेली नाहीय. त्यामुळे विश्वकरंडकातील आगामी सामन्यांमध्ये ऋषभ पंत भारतीय संघाकडून खेळणार, की नाही याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.