महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ICC Awards : रोहित 'सर्वोत्कृष्ट' तर विराट 'स्पिरीट ऑफ क्रिकेट' - आयसीसी अवार्ड २०१९

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून २०१९ या वर्षातील पुरस्कारांची बुधवारी घोषणा करण्यात आली आहे

icc awards 2019 : rohit sharma icc mens odi cricketer year
ICC Awards : रोहित-विराटला आयसीसीचा मोठा पुरस्कार

By

Published : Jan 15, 2020, 12:20 PM IST

Updated : Jan 15, 2020, 1:04 PM IST

दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून २०१९ या वर्षातील पुरस्कारांची बुधवारी घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय रोहित शर्मा, विराट कोहली आणि दीपक चहर यांनी पुरस्कार पटकावला आहे.

रोहित शर्मा -
२०१९ मधील वन-डेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार हिटमॅन रोहित शर्माने पटकावला.

कामगिरी -
रोहित शर्माने, २०१९ या वर्षात २८ एकदिवसीय सामन्यात ५७.३० च्या सरासरीने १४९० धावा केल्या आहेत. त्याने इंग्लंडमध्ये झालेल्या विश्व करंडक स्पर्धेत ५ शतकं ठोकली होती.

रोहित शर्मा

विराट कोहली -
आयसीसी विश्व करंडक स्पर्धेत विराटने केलेल्या एका कृतीमुळे त्याला 'स्पिरीट ऑफ क्रिकेट'चा पुरस्कार देण्यात आला.

विराटची काय होती कृती -
भारताचा कर्णधार विराट कोहलीने विश्व करंडक स्पर्धेदरम्यान स्टिव्ह स्मिथवर टीका करणाऱ्या प्रेक्षकांना सज्जड दम भरला होता. त्याच्या या कृतीला सर्वाधिक पसंती मिळाली होती.

विराट कोहली

दीपक चहर -
दीपक चहरने २०१९ मध्ये टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार पटकावला.

कामगिरी -
दीपक चहरने बांगलादेशविरुध्दच्या टी-२० सामन्यात हॅटट्रिकसह ७ धावांत ६ गडी बाद केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनने २०१९ च्या सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार जिंकला. कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजीत पॅट कमिन्स सर्वोत्तम ठरला. तर स्कॉटलंडच्या कायले कोएत्झर याने संलग्न संघटनांमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला.

यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार बेन स्टोक्सने पटकावला. इंग्लंडला विश्व करंडक जिंकून देणाऱ्या स्टोक्सने कसोटीतही आपला दबदबा राखला. अॅशेस मालिकेतील त्याची चिवट खेळी अविस्मरणीय ठरली. त्यामुळे त्याला यंदाची सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफी देण्यात आली.

Last Updated : Jan 15, 2020, 1:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details