महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

अनुराग दहिया आयसीसीचे नवीन वाणिज्य अधिकारी - अनुराग दहिया आयसीसीचे वाणिज्य अधिकारी न्यूज

आयसीसीमध्ये जाण्यापूर्वी अनुराग दहिया प्रसिद्ध टेलिकम्युनिकेशन ग्रुप 'सिंगटेल'मधील कंटेंट आणि मीडिया सेल्सचे प्रमुख होते.

ICC announces Anurag Dahiya as chief commercial officer
अनुराग दहिया आयसीसीचे नवीन वाणिज्य अधिकारी

By

Published : Jan 31, 2020, 2:09 PM IST

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी अनुराग दहिया यांची मुख्य वाणिज्य अधिकारी म्हणून नेमणूक करण्याची घोषणा केली. 'मीडिया जगात दहिया यांचा दोन दशकांहून अधिक व्यावसायिक अनुभव आहे', असे आयसीसीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आयसीसीमध्ये जाण्यापूर्वी ते प्रसिद्ध टेलिकम्युनिकेशन ग्रुप 'सिंगटेल'मधील कंटेंट आणि मीडिया सेल्सचे प्रमुख होते.

हेही वाचा -राणीने जिंकला 'वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलीट ऑफ द इयर'चा पुरस्कार

यापूर्वी फॉक्स इंटरनॅशनल चॅनेल्स (पूर्वी ईएसपीएन स्टार स्पोर्ट्स) मध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष (रणनीती व व्यवसाय विकास) म्हणून दहिया १४ वर्षे कार्यरत होते, असेही आयसीसीने म्हटले आहे.

'वाणिज्य अधिकारी म्हणून अनुरागचे आयसीसीमध्ये स्वागत आहे. वाणिज्य, माध्यम हक्कांचा त्यांच्याकडे व्यापक अनुभव आहे. या अनुभवाचा फायदा जागतिक विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आम्ही करणार आहोत, असे आयसीसीचे सीईओ मनु स्वाहने यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details