महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पृथ्वी शॉ म्हणतो, 'मी लवकरच परतेन' - पृथ्वी शॉ लेटेस्ट प्रतिक्रिया न्यूज

'मी आज २० वर्षांचा झालो आहे. मी खात्री देतो की हा पृथ्वी शॉ २.० आहे आणि मी नक्की पुढे जाईन. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. मी लवकरच परतेन', असे पृथ्वीने वाढदिवशी शेअर केलेल्या एका व्हिडिओत म्हटले आहे.

पृथ्वी शॉ म्हणतो, 'मी लवकरच परतेन'

By

Published : Nov 9, 2019, 9:41 PM IST

मुंबई - भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉने आपल्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. आज २०वा वाढदिवस साजरा करणारा सलामीवीर पृथ्वी शॉ सध्याच्या सय्यद मुश्ताक अली टी-२० करंडकात लवकरच मैदानावर खेळताना दिसू शकतो.

हेही वाचा -हिटमॅन मोठ्या विक्रमापासून 'दोन षटकार' दूर, असा विक्रम करणारा ठरणार पहिला भारतीय

'मी आज २० वर्षांचा झालो आहे. मी खात्री देतो की ही पृथ्वी शॉ २.० आहे आणि मी नक्की पुढे जाईन. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. मी लवकरच परतेन', असे पृथ्वीने वाढदिवशी शेअर केलेल्या एका व्हिडिओत म्हटले आहे.

पृथ्वीने आतापर्यंत भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले आहेत. राजकोट येथे झालेल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले होते. पृथ्वी शॉवरील आठ महिन्यांची बंदी येत्या १६ नोव्हेंबरला संपणार आहे. यामुळे सय्यद मुस्ताक अली क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या संघाच शॉची निवड करण्यात येऊ शकते. याबद्दलचे संकेत मुंबई क्रिकेट असोसिएशनने संकेत दिले होते. दरम्यान, शॉ डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याने त्यांच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली होती.

पृथ्वी शॉने खोकल्याचे औषध घेतले होते. या औषधामध्ये 'टर्बुटेलाइन' हे प्रतिबंधित द्रव्य आढळल्याने आंतरराष्ट्रीय अॅन्टी डोपिंग नियमानुसार त्याच्यावर १५ मार्च २०१९ पासून आठ महिन्यांची तात्पुरती बंदी घालण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details