लाहोर - विंडीजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारासमोर गोलंदाजी करताना मला अडचण येत होती. कारण त्याचे फुटवर्क उत्कृष्ट होते. त्याचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. मी त्याच्यासमोर कधीच आत्मविश्वासाने गोलंदाजी केली नाही, असे पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे.
सचिन नव्हे तर, 'या' फलंदाजासमोर आफ्रिदीचा आत्मविश्वास ढेपाळायचा - shahid afridi confidence over lara news
मी लारासमोर कधीच आत्मविश्वासाने गोलंदाजी केली नाही. त्याचा माझ्यावर खूप प्रभाव आहे, असे पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे.
आफ्रिदी म्हणाला, "लारा एक जागतिक दर्जाचा फलंदाज आहे. त्याने क्रिकेट खेळताना मुथय्या मुरलीधरनसारख्या महान फिरकीपटूंना त्रास दिला. फिरकीपटूंविरूद्ध त्याचे फुटवर्क उत्कृष्ट होते. त्याने ज्या प्रकारे उत्कृष्ट गोलंदाजांचा सामना केला, ते पाहणे आश्चर्यकारक होते."
वेस्ट इंडिजचा महान डावखुरा फलंदाज ब्रायन लाराने १६ वर्षांपूर्वी एक खास विक्रम रचला होता. तो विक्रम आजपर्यंत अबाधित आहे. १२ एप्रिल २००४ साली लाराने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळताना ५८२ चेंडूत नाबाद ४०० धावांची अविश्वसनीय खेळी केली. लाराच्या या खेळीत ४३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे.