मुंबई - आयसीसीची विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्याचे ध्येय भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्माने बाळगले आहे. रोहितने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून मुंबई संघाला चार वेळा आयपीएल विजेता बनवले आहे.
रोहितला आहे वर्ल्डकप जिंकण्याची इच्छा - rohit sharma on upcoming worldcup news
२०१५ आणि २०१९च्या विश्वकरंडक स्पर्धेत रोहित भारतीय संघाचा सदस्य होता. दोन्ही वेळा भारतीय संघ उपांत्य सामन्यात अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडून पराभूत झाला होता. रोहितने मुंबई इंडियन्सच्या ट्विटरवर म्हटले आहे, की प्रत्येक वेळी तुम्ही मैदानात जाता आणि प्रत्येक वेळी जिंकण्याची इच्छा व्यक्त करता. परंतु, वर्ल्डकप हा सर्वांचे शिखर आहे. मला वर्ल्डकप जिंकण्याची इच्छा आहे.
![रोहितला आहे वर्ल्डकप जिंकण्याची इच्छा I want to win the world cup said rohit sharma](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6948685-1052-6948685-1587917272582.jpg)
२०१५ आणि २०१९च्या विश्वकरंडक स्पर्धेत रोहित भारतीय संघाचा सदस्य होता. दोन्ही वेळा भारतीय संघ उपांत्य सामन्यात अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडून पराभूत झाला होता. रोहितने मुंबई इंडियन्सच्या ट्विटरवर म्हटले आहे, की प्रत्येक वेळी तुम्ही मैदानात जाता आणि प्रत्येक वेळी जिंकण्याची इच्छा व्यक्त करता. परंतु वर्ल्डकप हा सर्वांचे शिखर आहे. मला वर्ल्डकप जिंकण्याची इच्छा आहे.
यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणार्या टी -२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताला भाग घ्यावा लागणार आहे. तर, पुढच्या वर्षी भारताला ही स्पर्धा आयोजित करावी लागेल. त्यानंतर त्यांना २०२३ मध्ये ५० षटकांच्या विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन करावे लागेल.