महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

खेळांवर प्रेम करणारा नव्हे, खेळात भाग घेणारा भारत पाहिजे - सचिन तेंडुलकर - सहभाग

माझे असे लक्ष्य आहे, मला भारताला प्रत्येक खेळात सहभागी होणारा देश बनवायचे आहे.

सचिन तेंडुलकर १

By

Published : Mar 4, 2019, 2:26 PM IST

मुंबई- भारत खेळांवर प्रेम करणाऱ्या देशाऐवजी असा देश बनला पाहिजे, जो प्रत्येक खेळात सहभागी होणारा असेल, असे भारताचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने एका कार्यक्रमात म्हटले आहे.

सचिन म्हणाला, मी कितीतरी वेळा म्हटले आहे की, भारत खेळांवर प्रेम करणारा देश आहे. परंतु, खेळ खेळणारा देश नाही. यासाठी माझे असे लक्ष्य आहे, मला भारताला प्रत्येक खेळात सहभागी होणारा देश बनवायचे आहे.

आजच्या काळात करिअर निवडण्याच्या बाबतीत फक्त डॉक्टर आणि इंजिनिअर एवढे २ पर्यायच उपलब्ध नाहीत. आता शेफ आणि डान्सरसारखे पर्यायसुध्दा उपलब्ध आहेत. पालक यावर सकारात्मक दृष्टीने विचार करत आहेत. भारतात हळूहळू परिस्थिती बदलत आहे, असेही सचिन म्हणाला.

ABOUT THE AUTHOR

...view details