नवी दिल्ली - विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंड संघाकडून पराभव पत्कारावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघात फूट पडली असल्याच्या चर्चेने ऊत आला. संघात भारतीय कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा असे गट असल्याचे बोलले जात होते. मात्र, याचे वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने खंडन करत, संघात ऑल इज वेल असल्याचे सांगितले. रोहित शर्माने मात्र, यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. बुधवारी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपले मत व्यक्त केले.
रोहित शर्मा म्हणतो, 'मी केवळ संघासाठी नाही तर देशासाठी मैदानात उतरतो'
रोहित शर्माने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तो म्हणतो, 'मी केवळ संघासाठी नाही, तर देशासाठी मैदानात उतरतो.' या पोस्टसोबतच रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेत फलंदाजी करायला जातानाचा फोटो पोस्ट केला आहे.
रोहित शर्माने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तो म्हणतो, 'मी केवळ संघासाठी नाही, तर देशासाठी मैदानात उतरतो.' या पोस्टसोबतच रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेत फलंदाजी करायला जातानाचा फोटो पोस्ट केला आहे.
दरम्यान, भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर पोहोचला आहे. विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघाचा हा पहिलाच दौरा असून सर्व प्रकारातील मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे प्रयत्न असणार आहेत. मात्र, या दौऱ्यापूर्वी संघाच्या कर्णधार आणि उपकर्णधार यांच्यामध्ये वाद असल्याच्या चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगल्या. यावर कर्णधार विराट कोहलीने सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आमच्यात सगळ ठीक आहे असे सांगितले. त्यानंतर आता रोहित शर्माने ट्विट केल्याने, आता क्रिकेटप्रेमीमधून वेगवेगळे अन्वयार्थ काढले जात आहेत.