महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

“वर्ल्डकप फायनलमध्ये मी धोनीला वर फलंदाजी करण्यास सांगितले होते” - sachin told dhoni to bat above in 2011 wc news

एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीमध्ये सचिनने हा खुलासा केला. तो म्हणाला “श्रीलंकेकडे दोन उत्कृष्ट दर्जाचे फिरकीपटू होते. त्यामुळे गंभीरसोबत धोनीला वर पाठवले. जेणेकरून डावे-उजवे समीकरण चांगले जुळू शकेल. गौतम शानदार फलंदाजी करत होता. त्याच्याबरोबर धोनीसारखा फलंदाज सतत स्ट्राइक बदलू शकला असता. मी सेहवागतर्फे हा संदेश धोनीला पोहोचवला.”

I had asked Dhoni to bat above in wc 2011 said  Sachin
“वर्ल्डकप फायनलमध्ये मी धोनीला वर फलंदाजी करण्यास सांगितले होते”

By

Published : Apr 5, 2020, 5:21 PM IST

नवी दिल्ली -भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने २०११ च्या विश्वकरंडक स्पर्धेबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. वानखेडेवर पार पडलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात मी धोनीला वर फलंदाजी करण्यास सांगितले होते, असे सचिन म्हणाला. या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजासाठी उत्तम फॉर्मात असलेल्या युवराज सिंगला मैदानात उतरायचे होते मात्र, धोनी युवीच्या जागी मैदानात आला होता.

एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीमध्ये सचिनने हा खुलासा केला. तो म्हणाला “श्रीलंकेकडे दोन उत्कृष्ट दर्जाचे फिरकीपटू होते. त्यामुळे गंभीरसोबत धोनीला वर पाठवले. जेणेकरून डावे-उजवे समीकरण चांगले जुळू शकेल. गौतम शानदार फलंदाजी करत होता. त्याच्याबरोबर धोनीसारखा फलंदाज सतत स्ट्राइक बदलू शकला असता. मी सेहवागतर्फे हा संदेश धोनीला पोहोचवला.”

त्यानंतर, धोनी ड्रेसिंग रूममध्ये आला. त्याने या रणनीतीवर गॅरी कर्स्टनशी चर्चा केली. धोनीचा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा अधिकार भारतासाठी योग्य ठरला. त्याने नाबाद ९७ धावांची खेळी करून भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. यात गंभीरनेही महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ९७ धावांची शानदार खेळी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details