महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

चौथ्या क्रमांकासाठी दावेदारी पण कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी सज्ज - श्रेय्यर - श्रेयस अय्यर न्यूज

चौथ्या क्रमांकासाठी आणखीन प्रश्न उपस्थित न केलेलेच बरे, असे श्रेयसने सांगितले.

I can bat in any position depending on the situation: Shreyas Iyer
चौथ्या क्रमांकासाठी दावेदारी पण कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी सज्ज - श्रेय्यर

By

Published : Jun 9, 2020, 7:45 AM IST

मुंबई- गेल्या एका वर्षांत केलेल्या कामगिरीवरुन, मी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघातील चौथ्या क्रमांकासाठीची जागा निश्चित केली आहे. याचे मला समाधान वाटत आहे. मात्र मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी सज्ज आहे, असे टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने म्हटलं आहे.

टीम इंडियाला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाचा प्रश्न उद्भवत होता. या क्रमांकासाठी अंबाती रायुडू, विजय शंकर, ऋषभ पंत आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यात चुरस आहे. पण असे असले तरी इंग्लंडमध्ये २०१९ मध्ये पार पडलेल्या विश्व करंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून भारताला पराभूत व्हावे लागले. यानंतर भारतीय संघाने वेस्ट इंडीजचा दौरा केला. या दौऱ्यात अय्यरने चांगली कामगिरी केली. त्याने या दौऱ्यात २१७ धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर अय्यरने चौथ्या क्रमांकासाठी दावेदारी सादर केली आहे.

'गेल्या एका वर्षांत केलेल्या कामगिरीवरुन, मी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघातील चौथ्या क्रमांकासाठीची जागा निश्चित केली आहे. तुम्ही जेव्हा वर्षभर एकाच जागेवर खेळत असता, तेव्हा ती जागा तुम्ही निश्चित केली, असे मला वाटते. त्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी आणखीन प्रश्न उपस्थित न केलेलेच बरे, असे श्रेयसने सांगितले.

हेही वाचा -कोरोनामुक्त न्यूझीलंड : जिमी नीशमने दिल्या देशवासियांना शुभेच्छा

हेही वाचा -..त्या दौऱ्यात पाक क्रिकेट संघ व्यवस्थापनाने माझ्यावर बलात्काराचा आरोप करून संघाबाहेर ठेवले - अख्तर

ABOUT THE AUTHOR

...view details