हैदराबाद -इंडियन प्रीमिअर लीगच्या बाराव्या सत्रातील ३३ व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादसमोर आज ३ वेळा आयपीएलचा किताब जिंकलेल्या चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान असणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो शानदार फलंदाजी करत आहेत. मात्र मधली फळी मागच्या काही सामन्यांमध्ये सपशेल अपयशी ठरल्याने सनरायजर्सला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. गुणतालिकेचा विचार केला असता चेन्नई १४ गुणांसह पहिल्या तर हैदराबादचा संघ ६ गुणांसह सहाव्या स्थानी आहे.
चेन्नईत महेंद्रसिंह धोनी, शेन वॉटसन, फाफ डय़ू प्लेसिस, इम्रान ताहीर, हरभजन सिंग आणि रवींद्र जडेजा यांसारख्या दिग्गजांचा भरणा आहे. त्यामुळे आयपीएलमधल्या सर्वाधिक यशस्वी संघापैकी एक असलेल्या बलाढ्य चेन्नईचा सामना मागच्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरलेली हैदराबादची टीम कशी करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सनरायजर्स हैदराबाद -केन विल्यम्सन (कर्णधार), मनीष पांडे, मार्टिन गप्टिल, रिकी भुई, डेव्हिड वॉर्नर, दीपक हुडा, मोहमद नबी, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, अभिषेक शर्मा, विजय शंकर, श्रीवत्स गोस्वामी, जॉनी बेरिस्टो, वृद्धिमान साहा, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, बॅसिल थम्पी, बिली स्टॅनलेक, टी. नटराजन, संदीप शर्मा, शाहबाझ नदीम.
चेन्नई सुपर किंग्ज -एम.एस. धोनी (कर्णधार), रविंद्र जडेजा, सुरेश रैना, केदार जाधव, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, अंबाती रायडू, मुरली विजय, हरभजन सिंग, दीपक चहर, केएम असिफ, एन जगदिसन, मोनु सिंग, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई, ड्वेन ब्रावो, शेन वॉटसन, फाफ डुप्लेसिस, सॅम बिलिंग्स, इम्रान ताहीर, डेविड विली, मिशेल सॅन्टेनर, लुंगीसानी एन्गिडी, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड.