कटक -भारत आणि विंडीज यांच्यात बाराबती स्टेडियमवर तिसरा एकदिवसीय सामना रंगला आहे. या सामन्यात विंडीजचा धडाकेबाज फलंदाज शिम्रॉन हेटमायरने २ षटकार ठोकून एका विक्रमात विश्वविजेत्या इंग्लंडच्या कर्णधाराला मागे टाकले आहे.
हेही वाचा -नदालने पटकावले मुबादला विश्व टेनिस चॅम्पियनशिपचे विजेतेपद
भारताविरुद्ध अखेरच्या एकदिवसीय सामन्यात हेटमायरने ३७ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. हेटमायरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०१८ पासून सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. २०१९ च्या एकदिवसीय विश्वकरंडक विजेता संघाचा कर्णधार ईऑन मॉर्गनने २०१८ पासून ८९ षटकार ठोकले होते. तर, हेटमायरने ९१ षटकार मारले आहे.
चेन्नईच्या मैदानावर खेळवण्यात आलेला मालिकेतील पहिला सामना विंडीजने ८ गडी राखून जिंकला. त्यानंतर विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात, भारताने विंडीजचा १०७ धावांनी पराभव करत मालिका बरोबरीत साधली.