मेलबर्न -क्रिकेटविश्वात अनेकदा अविश्वसनीय झेल पकडले जातात. हवेत सूर मारून, चौकाराच्या सीमेवर उंच उडी घेऊन झेल पकडलेले तुम्ही पाहिले असतील. मात्र, दोन बोटांनी घेतलेला झेल तुम्ही पाहिला आहे का?
हेही वाचा -पाकच्या 'पंग्या'वर भारताचा दंगा, बीसीसीआयने घेतला 'हा' निर्णय
न्यूझीलंडचा क्षेत्ररक्षक हेन्री निकोल्सने असा कारनामा केला आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथला माघारी धाडण्यासाठी निकोल्सने हाताच्या दोन चेंडूंमध्ये असा झेल घेतला. त्याच्या या झेलमुळे प्रेक्षकही स्तब्ध झाले. सध्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांदरम्यान मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर दुसरी कसोटी सुरू आहे. स्मिथ ८५ धावांवर असताना गोलंदाज नील वॅगनरने निकोल्सकरवी त्याला बाद केले.
या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकावे लागले होते. मात्र, दुसर्या सामन्यात त्याने पुनरागमन करताना पहिल्याच षटकात सलामीवीर जो बर्न्सला खातेही न उघडता माघारी पाठवले. ट्रेविस हेडचे शतक आणि मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, टीम पेन यांच्या अर्धशतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४६७ धावा केल्या आहेत.