हैदराबाद- भारत आणि वेस्ट इंडीज संघातील ३ सामन्याच्या टी-२० मालिकेला ६ डिसेंबर पासून सुरूवात होणार आहे. उभय संघात पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी दोनही संघ हैदराबादमध्ये आधीच पोहोचले असून संघांनी कसून सराव केला.
भारत-वेस्ट इंडीज संघातील झालेल्या सामन्यांची आकडेवारी पाहिल्यास भारतीय संघाची कामगिरी दमदार आहे. टी-२० क्रिकेटमध्ये पाचव्या स्थानी विराजमान असलेला भारतीय संघ १० व्या स्थानी असलेल्या विंडीजवर नेहमीच 'भारी' ठरला आहे.
वेस्ट इंडीज संघाची कामगिरी मागील ३ वर्षांत खालावली आहे. उभय संघात आतापर्यंत एकूण १४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने झाली आहेत. यात भारतीय संघाने ८ वेळा तर विडींजने ५ वेळा बाजी मारली आहे. एका सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही. महत्वाची बाब म्हणजे, विडींज विरुध्द मागील ६ सामन्यात भारतीय संघ एकदाही पराभूत झालेला नाही.