मेलबर्न - कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इंग्लंड क्रिकेट संघाने प्रतिस्पर्धी खेळाडू आणि चाहत्यांशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. मात्र, ऑस्ट्रेलियन संघाने याविरूद्ध निर्णय घेत हस्तांदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा -राशिदच्या 'कॅमल बॅट'चं रहस्य काय?
ऑस्ट्रेलियाच्या पुरूष क्रिकेट संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी याबाबत माहिती दिली. 'आमच्याकडे पुरेसे सॅनिटायझर्स आहेत. त्यामुळे आम्ही हस्तांदोलन करण्यास घाबरत नाही', ऑस्ट्रेलियन संघाने स्पष्ट केले आहे. ड्रेसिंग रूममध्ये किंवा मैदानावर एकमेकांना भेटण्याच्या पद्धतीत कोणताही बदल होणार नाही, असेही लँगर यांनी स्पष्ट केले आहे.
ऑस्ट्रेलियाला चॅपल-हेडली ट्रॉफी अंतर्गत शुक्रवारपासून न्यूझीलंडबरोबर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. आतापर्यंत जगभरात कोरोना व्हायरसच्या दहा लाखाहून अधिक घटनांची पुष्टी झाली आहे. या संसर्गजन्य आजारामुळे आतापर्यंत ३००० हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे.