मुंबई- भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ हिने सोशल मीडियावर स्वत:चा न्यूड फोटो शेअर केला आहे. धक्कादायक म्हणजे हा फोटो शेअर करताना तिने पतीसाठी मेसेज लिहिला आहे. या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून नेटिझन्स फोटोवर चांगलेच भडकले आहेत.
हसीन जहाँ सोशल मीडियावर सक्रीय असते. ती याआधी व्हिडिओमुळे अनेक वेळा चर्चेत आली होती. आता हसीनने सोशल मीडियावर न्यूड फोटो शेअर करून सर्वांना धक्काच दिला आहे.
तिने न्यूड फोटो शेअर करताना एक मॅसेज लिहला आहे. त्यात ती म्हणते 'कल तू कुछ नहीं था तो मैं पाक थी, आज तू कुछ बन गया तो मैं नापाक हो गई। झूठ बुर्खा डालकर बेपर्दा सच को मिटा नहीं सकता। मगरमच्छ के आंसू कुछ दिनों का ही सहारा होते हैं.'