महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

शमीच्या अटक वॉरंट नंतर हसीन जहान म्हणते, 'मला ममता दीदीने वाचवले' - हसीन जहान

शमीची पत्नी हसीन जहान म्हणाली, 'मला ममता बॅनर्जींनी वाचवले. मी न्यायालयीन यंत्रणेची आभारी आहे. वर्षभरापासून मी न्यायासाठी झगडत आहे. जर शमी एक मोठा क्रिकेटपटू आणि खूप शक्तिशाली आहे असा विचार तो करत असेल तर तसे नाही. जर मी पश्चिम बंगालची नसते, ममता बॅनर्जी आमच्या मुख्यमंत्री नसत्या तर मी इथे सुखाने राहिले नसते. अमरोहा (उत्तर प्रदेश) पोलिसांनी मला आणि माझ्या मुलीला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला, ते यशस्वी झाले नाहीत.'

शमीच्या अटक वॉरंट नंतर हसीन जहान म्हणते, 'मला ममता दीदीने वाचवले'

By

Published : Sep 3, 2019, 6:13 PM IST

कोलकाता -टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमी विरूद्ध घरगुती हिंसाचारबद्दल कोलकाताच्या अलीपूर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले. घरगुती हिंसाचारबद्दल शमीच्या पत्नीने त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी हसीन जहानने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा -राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशीप : गुणतालिकेत महाराष्ट्र आहे 'या' क्रमांकावर

शमीची पत्नी हसीन जहान म्हणाली, 'मला ममता बॅनर्जींनी वाचवले. मी न्यायालयीन यंत्रणेची आभारी आहे. वर्षभरापासून मी न्यायासाठी झगडत आहे. जर शमी एक मोठा क्रिकेटपटू आणि खूप शक्तिशाली आहे असा विचार तो करत असेल तर तसे नाही. जर मी पश्चिम बंगालची नसते, ममता बॅनर्जी आमच्या मुख्यमंत्री नसत्या तर मी इथे सुखाने राहिले नसते. अमरोहा (उत्तर प्रदेश) पोलिसांनी मला आणि माझ्या मुलीला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला, ते यशस्वी झाले नाहीत.'

हेही वाचा -स्मिथचा विराटला 'ओव्हरटेक', आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी

न्यायालयाच्या या आदेशानंतर शमीकडे या खटल्यात जामीन मिळवण्यासाठी १५ दिवसांची मुदत आहे. १५ दिवसांच्या आत त्याला जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल करायचा आहे. २००८ मध्ये शमी यांची पत्नी हसीन जहान यांनी शमीविरोधात घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले होते. त्यानंतर शमी आणि त्याच्या भावावर घरगुती हिंसाचारबद्दल आय.पी.सी च्या कलम ४९८ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details