मुंबई - भारतीय महिला क्रिकेट संघाला जोरदार झटका बसला आहे. उपकर्णधार हरमनप्रीत कौर टाचेच्या दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडली आहे. हरमनप्रीतला पतियाळा येथे सराव सत्रादरम्यान टाचेला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून हरमनप्रीत 'आऊट' - Harmanpreet Kaur
भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध मुंबईत ३ सामन्यांची मालिका २२ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे.

हरमनप्रीत कौर
भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध मुंबईत ३ सामन्यांची मालिका २२ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. त्यानंतर ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका गुवाहाटी येथे ४ मार्चपासून सुरू होणार आहे.
इंग्लंड संघाविरुद्ध २ सराव सामन्यात खेळणारी हरलीन देओल हिला पहिल्यांदा भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. हरमनप्रीत जर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांपर्यंत फिट झाली नाही तर स्मृति मंधाना तिच्या जागी संघाचे नेतृत्व करेल.