मुंबई -अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले आहे. हार्दिक2015पासून रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्समध्ये खेळत आहे. मुंबई इंडियन्सने तीन वेळा आयपीएलचे जेतेपद मिळविले आहे.
''मला नेहमी रोहितबरोबर खेळताना आनंद मिळाला आहे. तो एक उत्तम कर्णधार आहे. आम्ही दोघेही सामन्याबद्दल फारसे बोलत नाही, पण मी माझा सर्वोत्तम काळ त्याच्या नेतृत्वाखाली घालवला आहे,'' असे हार्दिक म्हणाला.