महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टीम इंडियाला धक्का, हार्दिक पांड्या 'या'मुळं अनिश्चित कालावधीपर्यंत क्रिकेटपासून लांब राहणार - खेळाडूंना दुखापतीविषयी बातमी

बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्याची पाठीची दुखापत पुन्हा उफाळून आली आहे. यामुळे हार्दिक उपचारासाठी लवकरच इंग्लंडला जाण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाला धक्का, हार्दिक पांड्या 'या'मुळं अनिश्चित कालावधीपर्यंत क्रिकेटपासून लांब राहणार

By

Published : Oct 1, 2019, 7:41 PM IST

नवी दिल्ली - टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्या दुखापतीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यामुळे हार्दिक आगामी बांगलादेश विरुध्दच्या टी-२० मालिकेसह पुढील काही महिन्यांपर्यंत क्रिकेट खेळू शकणार नाही.

बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्याची पाठीची दुखापत पुन्हा उफाळून आली आहे. यामुळे हार्दिक उपचारासाठी लवकरच इंग्लंडला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात दुबईमध्ये खेळवण्यात आलेल्या आशिया चषक स्पर्धेत पांड्याला दुखापत झाली होती. याचा त्रास हार्दिकला पुन्हा होत आहे.

हेही वाचा -विराट म्हणतो, रोहितने आक्रमक सुरूवात दिली की संपलं...त्यासाठी त्याला पुरेसा वेळ देऊ

बीसीसीआयच्या सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, हार्दिक पांड्या उपचारासाठी लवकरच इंग्लंडला रवाना होणार आहे. पहिल्यांदा हार्दिकच्या या दुखापतीवर ज्या डॉक्टरांनी उपचार केले होते. त्याच डॉक्टरांकडे हार्दिक परत उपचारासाठी जाणार आहे.

हार्दिकच्या पाठीवर सर्जरी करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर सर्जरी झाल्यास त्याला पुढील काही महिने क्रिकेटपासून लांब राहावे लागणार आहे. दरम्यान, पाठीला दुखापत होणारा हार्दिक भारताचा दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली आहे. यामुळे बुमराहने आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली.

हेही वाचा -अ‌ॅरान फिंचचं 'तुफान'...एकहाती जिंकला सामना

ABOUT THE AUTHOR

...view details