नवी मुंबई -सध्या सुरू असलेल्या डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धेत ३९ चेंडूमध्ये १०५ धावांची खेळी करत भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने दणक्यात पुनरागमन केले आहे. रिलायन्स-१ संघाकडून खेळताना हार्दिकने आठ चौकार आणि १० षटकार लगावले. त्याच्या या खेळीच्या जोरावर संघाने २० षटकात २५२ धावांचा डोंगर उभारला.
हेही वाचा -Women's T२० WC : ..तर टीम इंडिया सामना न खेळताच अंतिम फेरीत, वाचा कारण
या धमाकेदार खेळीनंतर हार्दिकने आपली प्रतिक्रिया दिली. 'माझ्यासारख्या खेळाडूंसाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. मी सहा महिने बाहेर होतो. खूप दिवसानंतर मी दुसरा सामना खेळत होतो. कदाचित मी आणि माझे शरीर सध्या चांगल्या स्थितीत आहे. ज्या गोष्टी घडत आहेत त्यामुळे मी आनंदी आहे', असे हार्दिकने सामन्यानंतर म्हटले आहे.
हार्दिकच्या पाठीवर काही महिन्यांपूर्वी लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याला आशिया चषकादरम्यान पाठीला दुखापत झाली. तो त्यानंतरही काही मालिकांमध्ये खेळला. मात्र, २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत हार्दिकची दुखापत पुन्हा उफाळून आली आणि तो संघाबाहेर गेला.