मुंबई - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर पडलेला भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक कमरेच्या दुखापतीमुळे त्रस्त असल्याने बीसीसीआयकडून पांड्याच्या जागी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रवींद्र जाडेजाची संघात निवड करण्यात आली होती.
आयपीएलपूर्वी हार्दिक 'फिट'; सराव सत्रात घेतला सहभाग - Mumbai Indians
हार्दिक आयपीएलमध्ये मुंबईचे प्रतिनीधीत्व करण्यास तो पूर्णपणे तयार
हार्दिक पंड्या
हार्दिक २३ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळणार की नाही यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हार्दिक आता दुखापतीतून सावरल्याने आयपीएलमध्ये मुंबईचे प्रतिनीधीत्व करण्यास तो पूर्णपणे तयार आहे.
तीन वेळा आयपीएलचा विजेता असलेल्या मुंबई इंडियन्स संघाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की हार्दिकसोबत त्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्याही सराव सत्रात सहभागी झाला होता.