मुंबई -भारताचा अष्टपैलू खेळा़डू हार्दिक पांड्याने तब्बल सहा महिन्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले. डी.वाय. पाटील टी-२० स्पर्धेत त्याने धमाकेदार कामगिरीचे प्रदर्शन करत आफ्रिकेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले. या मालिकेसाठी हार्दिक जोरात सराव करत असून त्याच्या सरावादरम्यानचा एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
हेही वाचा -भारताचा भालाफेकपटू शिवपाल करणार पहिल्यांदाच ऑलिम्पिकवारी
या व्हिडिओमध्ये हार्दिक एक 'कडक' फटका खेळताना दिसत आहे. या फटक्याचा आवाज ऐकून चाहत्यांनीही त्याचे कौतुक केले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १२ मार्चपासून एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार असून मालिकेतील पहिला सामना धर्मशाळा येथे होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिक पांड्या, भुवनेश्वर आणि शिखर धवनचे संघात पुनरागमन झाले आहे.
असा आहे आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ -
शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव आणि शुभमन गिल.