महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पांड्या फिटनेस टेस्टमध्ये 'नापास', न्यूझीलंड दौऱ्यासाठी 'या' अष्टपैलू खेळाडूची निवड - हार्दिक पांड्या लेटेस्ट न्यूज

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने या चाचणीविषयी माहिती दिली. पांड्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून तामिळनाडूचा कर्णधार विजय शंकरला संघात स्थान देण्यात आले आहे.

Hardik pandya fails in fitness test, exits New Zealand tour
पांड्या फिटनेस टेस्टमध्ये 'नापास', न्यूझीलंड दौऱयासाठी 'या' अष्टपैलू खेळाडूची निवड

By

Published : Jan 12, 2020, 7:46 AM IST

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये 'नापास' झाला आहे. या कारणामुळे त्याला भारत 'अ' संघातून वगळण्यात आले. पांड्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून तामिळनाडूचा कर्णधार विजय शंकरला संघात स्थान देण्यात आले आहे.

विजय शंकर

हेही वाचा -बुद्धीबळातील राजकन्या - कोनेरू हंपी

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने या चाचणीविषयी माहिती दिली. 'हार्दिक अनिवार्य असलेल्या तंदुरुस्तीच्या दोन चाचणीत अपयशी ठरला. त्याचे गुण खूप कमी होते, जे हे सिद्ध करतात की ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी योग्य नाहीत. अशा परिस्थितीत तो भारत 'अ' संघाबरोबर येऊ शकत नाही. 'यो-यो' चाचणी भारत 'अ' संघाच्या फिटनेस टेस्टमध्ये समाविष्ट नाही. हार्दिकला कोणताही रणजी ट्रॉफी सामना न खेळता निवड समितीने संघात स्थान दिले होते', असे या अधिकाऱ्याने म्हटले. या दौऱ्यावर भारत 'अ' संघ तीन लिस्ट 'ए' आणि दोन एकदिवसीय सामन्यांपूर्वी यजमान संघासोबत दोन एकदिवसीय सराव सामने खेळणार आहे.

२४ जानेवारीपासून सुरू होणार्‍या या दौऱ्यात भारतीय संघ पाच टी-२० आंतरराष्ट्रीय, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौर्‍यासाठी असलेल्या संघाची रविवारी निवड होईल.

यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणार्‍या टी-२० विश्वचषक स्पर्धेला समोर ठेऊन निवड समितीचे लक्ष मर्यादित क्रिकेटसाठी महत्त्वाच्या खेळाडूंच्या निवडीवर असेल. वरिष्ठ टीमच्या दौऱ्यासह जर भारत 'अ' संघाचा दौरा देखील होत असेल तर निवड समितीस आवश्यक असल्यास त्वरित खेळाडूंचा समावेश करण्याचा पर्याय असेल.

ABOUT THE AUTHOR

...view details